ईदच्या तोंडावरच हजारो मुंबईकर बेघर; गरीब नगरमध्ये 400 झोपड्यांवर बुलडोझर, रहिवशांच्या डोळ्यांदेखत घरं जमीनदोस्त

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील सुमारे पाच हजार २०० चौरस मीटर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम पश्चिम रेल्वेने मंगळवारपासून सुरू केले आहे. तब्बल नऊ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गरीब नगरमधील सुमारे ४०० झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी २० टक्के काम पूर्ण झाले आहे. २३ मेपर्यंत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू राहणार आहे.

वांद्रे टर्मिनसचा विकास

भारतीय रेल्वेतील सर्वांत मोठ्या अतिक्रमण हटाव मोहिमांत या कारवाईचा समावेश असून यामुळे सुमारे ६०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन पश्चिम रेल्वेच्या पुन्हा ताब्यात येणार आहे. या ठिकाणी वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याचे, तसेच ‘इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स’ उभारण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *