13 वर्षांची मुलगी गरोदर! बेकरीवर खाऊ घेण्यास येणाऱ्या चिमुकलीसोबत 31 वर्षीय नराधमाचं दुष्कृत्य

नसरापूरच्या घटनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळलेली असतानाच आता मायानगरी मुंबईतही लहान मुलं आणि महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईतून नुकतंच एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकरण समोर  आलं आहे. जिथं 13 वर्ष 8 महिने इतकं वय असणाऱ्या एका चिमुरडीवर नराधमानं 3 ते 4 वेळा लैंगिक अत्याचार केला.

विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर आरोपी नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान या 31 वर्षीय नराधमाकडून चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची हादरवणारी माहिती समोर आली. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पीडित चिमुरडी अनेकदा आरोपीच्या बेकरीवर खाऊ घेण्यास जायची. त्यातवेळी तिच्यावर वाईट नजर ठेवून भुरळ पाडून बेकरीमागे असणाऱ्या त्याच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ही कृत्य केल्यानंतर ‘तुला मारून टाकेन, गप्प बस’ असं म्हणत मुलीला हा नराधम धमकी द्यायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *