सलमानचा साखरपुडा झाला?

सलमानचा साखरपुडा झाला?

बॉलिवूड दबंग खानच्या लग्नाविषयी अनेकदा चर्चा होत असतात. पण आता सलमानने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रोमानियन सुंदरी लुलिया वंतूर आणि सलमानने गुपचूप साखरपूडा केल्याचे सर्वत्र बोले जात आहे.

दोन वर्षापुर्वी सलमान आणि लुलियाच्या भेटीच्या बातम्या येत होत्या. लुलिया गेल्या एक महिन्यापासून रोमनमध्ये परतली आहे. सलमान आणि लुलियाने गुपचूप साखरपूडा केला असून येणा-या पुढच्या वर्षात हे दोघजण लग्न करणार असल्याचे लुलियाच्या खासगी सचिवाने सांगितले.

सलमानच्या या बातमीने त्याचा खरच साखरपुडा झाला आहे का?, असा प्रश्न  त्याच्या चाहत्यांना पडला आहे. सलमानने या बातमीबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र सलमानच्या चाहत्यांना आता खरे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *