स्मृती इराणींच्या हस्ते पदवी घेण्यास विद्यार्थ्याचा नकार

स्मृती इराणींच्या हस्ते पदवी घेण्यास विद्यार्थ्याचा नकार

दादरी घटनेनंतर साहित्यिक पुरस्कार परत करत असताना आता श्रीनगरमधील एका विद्यार्थ्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

समीर गोजवारी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. श्रीनगरमधील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी या महाविद्यालयातून समीरने एमबीए केले आहे.

मात्र, त्याने देशातील नागरिकांचे व्यक्तीस्वातंत्र्य हिरावणा-या सरकारकडून ही पदवी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

समीरने याबाबतची माहिती त्याच्या फेसबुक पेजवर दिली आहे. पदवी ही एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नसल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे साहित्यिकांपाठोपाठ आता विद्यार्थ्यानेही केंद्र सरकारविरोधात निषेधाचे हत्यार उपसल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *