राजकोट स्टेडियमबाहेर हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

राजकोट स्टेडियमबाहेर हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उधळून लावण्याचा पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

रविवारी दुपारी राजकोट स्टेडियममध्ये घुसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतले. हार्दिक पटेल यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उधळून लावण्याची धमकी दिली होती.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी रात्रीपासून राजकोटमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. पोलिसांचा फौजफाटाही स्टेडियम परिसरात तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *