जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन, वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसातून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते आणि अखेर शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ आनंद नाडकर्णी यांनी मनोविकारांबद्दलचे गैरसमज टाळून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मोठं काम केलं.

मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध चळवळ उभारण्यासाठी डॉ आनंद नाडकर्णी यांनी 23 मार्च 1990 रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मोठे काम केलं.  डॉ. आनंद नाडकर्णी यांनी एम.बी.बी.एसची पदवी पूर्ण करून मग 1984 मध्ये मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी ही पदवी घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *