एलपीजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये सध्या देशभर तसेच महाराष्ट्रात मोठी स्थिरता आणि काही ठिकाणी वाढ दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जा संकट, पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार यामुळे इंधन आणि गॅस बाजारावर सतत दबाव आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) अलीकडेच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल केले आहेत.
देशातील प्रमुख शहरांमध्ये काय आहेत दर?
देशातील प्रमुख शहरांमध्ये १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर पाहिले तर दिल्लीमध्ये ₹913, मुंबईमध्ये ₹912.50, चेन्नईमध्ये ₹928.50, तर कोलकत्तामध्ये ₹939 इतका दर आहे. हैद्राबादमध्ये हा दर ₹965 पर्यंत पोहोचला आहे, तर बेंगलोरमध्ये ₹915.50 इतका दर नोंदवला गेला आहे. व्यावसायिक १९ किलो एलपीजी सिलेंडरचे दर पाहता दिल्लीमध्ये ₹3,071.50, मुंबईमध्ये ₹3,024, चेन्नईमध्ये ₹3,237, तर कोलकत्तामध्ये ₹3,202 इतका दर आहे. हैद्राबाद मध्ये हा दर ₹3,315 पर्यंत गेला आहे, तर बेंगलोर मध्ये ₹3,152 इतका नोंदवला गेला आहे.
पीएनजीच्या दरात फरक
पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस)च्या दरांमध्येही शहरानुसार फरक दिसून येतो. दिल्ली मध्ये प्रति SCM ₹47.9, मुंबई मध्ये ₹50, चेन्नई आणि कोलकत्ता मध्ये ₹50 इतका दर आहे. हैद्राबादमध्ये ₹51 आणि बेंगलोरमध्ये ₹52 इतका दर नोंदवला गेला आहे.
महाराष्ट्र्रामधील स्थिती
महाराष्ट्र्रामधील आकडे पाहता घरगुती एलपीजी दर बहुतांश शहरांमध्ये स्थिर आहेत, मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सुमारे ₹993 पर्यंत वाढ झाल्याचे दिसते. अहमदनगर, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये घरगुती सिलेंडरचे दर साधारण ₹912 ते ₹973 दरम्यान आहेत.
पीएनजी दरांमध्ये मात्र कोणताही मोठा बदल झालेला नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये दर साधारण ₹44 ते ₹50 दरम्यान स्थिर आहेत. काही ठिकाणी जसे लातूर, धाराशिव आणि रत्नागिरी येथे दर तुलनेने कमी म्हणजे सुमारे ₹44 इतका आहे.
एकूणच पाहता, सध्याच्या घडीला घरगुती एलपीजी दर स्थिर आहेत, पण व्यावसायिक सिलेंडर आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेमुळे पुढील काळात किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजचे महाराष्ट्रतील PNG दर
अहमदनगर ₹48.50, छत्रपती संभाजीनगर ₹47.08, कोल्हापूर ₹49.30, लातूर ₹44.00, मुंबई ₹50.00, नंदुरबार ₹48.31, नाशिक ₹50.25, धाराशिव ₹44.00, पालघर ₹50.87, पुणे ₹50.65, रायगड ₹50.00, रत्नागिरी ₹44.00, सांगली ₹48.50, सातारा ₹48.50, सिंधुदुर्ग ₹49.25, सोलापूर ₹48.50, ठाणे ₹50.00.
आजचे महाराष्ट्रतील LPG दर
अहमदनगर – घरगुती सिलेंडर ₹926.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,113.00, अकोला – घरगुती सिलेंडर ₹933.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,152.50, अमरावती – घरगुती सिलेंडर ₹946.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,183.00, छत्रपती संभाजीनगर – घरगुती सिलेंडर ₹921.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,129.50, भंडारा – घरगुती सिलेंडर ₹973.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,259.00, बीड – घरगुती सिलेंडर ₹938.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,159.00, बुलढाणा – घरगुती सिलेंडर ₹927.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,132.00, चंद्रपूर – घरगुती सिलेंडर ₹961.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,235.50, धुळे – घरगुती सिलेंडर ₹933.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,139.00, गडचिरोली – घरगुती सिलेंडर ₹982.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,273.50, गोंदिया – घरगुती सिलेंडर ₹981.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,273.50, मुंबई उपनगर (ग्रेटर मुंबई) – घरगुती सिलेंडर ₹912.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,024.00, हिंगोली – घरगुती सिलेंडर ₹938.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,155.00, जळगाव – घरगुती सिलेंडर ₹918.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,113.50, जालना – घरगुती सिलेंडर ₹921.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,136.00, कोल्हापूर – घरगुती सिलेंडर ₹915.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,047.00, लातूर – घरगुती सिलेंडर ₹937.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,149.50, मुंबई – घरगुती सिलेंडर ₹912.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,024.00, नागपूर – घरगुती सिलेंडर ₹964.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,248.00, नांदेड – घरगुती सिलेंडर ₹938.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,155.00, नंदुरबार – घरगुती सिलेंडर ₹925.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,051.00, नाशिक – घरगुती सिलेंडर ₹916.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,100.00, धाराशिव – घरगुती सिलेंडर ₹937.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,155.50, पालघर – घरगुती सिलेंडर ₹924.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,052.50, परभणी – घरगुती सिलेंडर ₹939.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,160.50, पुणे – घरगुती सिलेंडर ₹916.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,084.50, रायगड – घरगुती सिलेंडर ₹923.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,049.50, रत्नागिरी – घरगुती सिलेंडर ₹927.50, व्यावसायिक सिलेंडर ₹2,123.00, सांगली – घरगुती सिलेंडर ₹915.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,047.00, सातारा – घरगुती सिलेंडर ₹917.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,091.50, सिंधुदुर्ग – घरगुती सिलेंडर ₹927.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,073.50, सोलापूर – घरगुती सिलेंडर ₹920.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,124.00, ठाणे – घरगुती सिलेंडर ₹912.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,026.00, वर्धा – घरगुती सिलेंडर ₹973.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,263.50, वाशिम – घरगुती सिलेंडर ₹933.00, व्यावसायिक सिलेंडर ₹3,145.00, यवतमाळ – घरगुती सिलेंडर ₹954.50, व्यावसायिक सिलेंडर ₹3,197.00.
