‘स्वारगेट ते कात्रज’ भुयारी मेट्रोने प्रवास होणार! बोगद्याच्या ‘सेगमेंटचे कास्टिंग’ सुरू; कशी-कुठे असतील स्थानकं

स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेच्या पहिल्या सेगमेंटचे कास्टिंग सुरू झाले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणेकरांनी ‘मेट्रो’चा अधिकाधिक वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ‘मेट्रोचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी ‘महामेट्रो’कडून स्वतंत्र प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कामाचे उद्घाटन झाले

पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या ५.४६ किलोमीटर लांबीच्या भूमिगत विस्तारित मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली. यासाठीच्या पहिल्या ‘टीबीएम टनेल सेगमेंट’च्या कास्टिंग कामाचे उद्घाटन मंगळवारी झाले. ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ झाला. ‘महामेट्रो’चे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल (प्रणाली व संचालन), हरेंद्र पांडे (वित्त) यांच्यासह अन्य अधिकारी व कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अत्याधुनिक ‘टीबीएम’द्वारे या मार्गिकेसाठीचा बोगदा खणला जाणार आहे. बोगद्याच्या मजबुतीकरणासाठी ‘प्रीकास्ट आरसीसी सेगमेंट’चा वापर केला जातो. या ९.७ किमी (दोन्ही बाजूंचे बोगदे मिळून) लांबीच्या मार्गासाठी एकूण सहा हजार ९९३ रिंग तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक रिंग ही ‘पाच अधिक एक’ (‘सेगमेंट’ अधिक ‘की सेगमेंट’) या रचनेत असेल. यासाठी आठ विशेष साचे वापरले जात आहेत. बोगद्याचा बाह्य व्यास ६.३५ मीटर असून, अंतर्गत व्यास ५.८ मीटर आहे. प्रत्येक सेगमेंटची जाडी २७५ मिलिमीटर असून, रिंगची रुंदी १.४ मीटर आहे. या मार्गावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर, कात्रज अशी स्थानके आहेत.

‘मेट्रोचा वापर करा’

‘स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेच्या पहिल्या सेगमेंटचे कास्टिंग सुरू झाले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणेकरांनी ‘मेट्रो’चा अधिकाधिक वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ‘मेट्रोचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी ‘महामेट्रो’ कडून स्वतंत्र प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पथदिव्यांच्या कामात त्रुटी

सिंहगड रस्ता परिसरातील ४०हून अधिक नव्या पथदिव्यांची चोरी झाली आहे. जुन्या मीटरचे रीडिंग व नव्या फिटिंग्जनंतर होणारी वीजबचत याचा तुलनात्मक तक्ता सादर करण्यास ‘महाप्रीत’कडून टाळाटाळ केली जात आहे. ‘स्काडा’अहवालात अनेक त्रुटी आहेत, तर काही ठिकाणी केबलचे जॉइंट व जोडणीमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विद्युत विभागाने ‘महाप्रीत’ला सर्व त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय बिल देणार नसल्याचा इशाराही दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *