गर्भवती असल्याने निदा खानला तातडीने जामीन मिळावा; अर्जावर कोर्टाचा मोठा निर्णय, नाशिकरोड कारागृहातील मुक्काम वाढला

बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलेवर अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नात न्यायालयीन कोठडीत असलेली संशयित निदा एजाज खान हिचा नाशिकरोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. निदा गर्भवती असल्याने तिला तातडीने जामीन मिळावा या हेतूने दाखल झालेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने आता २५ मे रोजी सुनावणी ठेवली आहे. यासह उर्वरित गुन्ह्यातील संशयितांच्या जामीन अर्जांवर उद्या (दि. १५) अंतिम सुनावणीची शक्यता आहे.

निदाला सात मे रोजी अटक

देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल गुन्ह्यात २६ मार्चपासून पसार असलेल्या निदा खानचा २ मे रोजी नाशिकरोड न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. ७ मे रोजी तिला छत्रपती संभाजीनगरातून अटक झाल्यावर ८ ते ११ मे निदा पोलिस कोठडीत होती. १२ ते २५ मे तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, बुधवारी (दि. १३) निदा खान हिच्यामार्फत वकील राहुल कासलीवाल यांनी जामीन अर्ज सादर केला. नाशिकरोड न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांच्या न्यायकक्षात बुधवारी (दि. १३) सुनावणी झाली. प्राथमिक युक्तिवादानंतर तपास अधिकारी, सरकारी अभियोक्तांचे म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने पुढील तारीख सुनावली.

धर्मांतराचा प्रयत्न आणि मांसाहार

याच गुन्ह्यातील संशयित दानिश शेख व तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. तर तरुणाच्या धर्मांतराचा प्रयत्न आणि जबरदस्तीने मांसाहार प्रकरणात संशयित दानिश शेख याच्या जामीन अर्जावर ६ जून रोजी सुनावणी होईल. त्यामुळे तुर्तास सर्व संशयितांचा नाशिकरोड कारागृहातील मुक्काम का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *