पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून दररोज हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने टोकं गाठलं. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या भाजपा सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांचा पीए चंद्रनाथ रथ यांची बंगालमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर आणखीन एक घटना समोर आली असून यात अज्ञातांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात भाजपचे 5 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
