‘खटखट’ आवाजानं केला खेळ खल्लास; घरात खोदकामादरम्यान काय घडलं? समोर जे दिसलं त्यावरून कोणाचीच नजर हटेना

एखादी व्हायरल घटना किंवा बातमी समोर आली, की त्याबद्दल असंख्य प्रश्न मनात घर करून जातात. सोशल मीडियापासून ते गुगलपर्यंत शक्य त्या परिनं अमुक एका घटनेची आणखी माहिती मिळवण्यासाठीचे प्रयत्नही सुरू होतात. हे प्रयत्न कुतूहलापोटी असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जिथं घराच्या खोदकामादरम्यान जे काही समोर आलं ते पाहून सारेच हैराण झाले.

उत्तर प्रदेशातील अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जसरथपूर क्षेत्रातील दहेलिया पुठ इथं जमिनीखाली सापडलेल्या भूमिगत टँक प्रकरणी अखेर प्रशासनानं कारवाई केली आहे. प्रथमत: इथं नेमकं काय आहे, असाच प्रश्न अनेकांना पडला, खजिना आणि तत्सम गोष्टींबाबत तर्कही लावले गेले. मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सदर घटनेमध्ये दोनदा प्रशासनाला माहिती दिल्यानंतरही खोदकामासाठी गेलेल्या टीमला यश मिळालं नाही  मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर घराच्या कामात तिसऱ्यांदा जेव्हा खोदकाम करण्यात आलं तेव्हा खटखट आवाज आला आणि जमिनीत असणारा टँक, त्यातील पेट्रोलियमवजा पदार्थ पाहून सगळेच अवाक् झाले.

सरपंच आणि तक्रारकर्ता ललित मोहन मिश्रा यांच्या माहितीनुसार जवळपास दोन महिन्यांपूर्वी एटा जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री पोर्टलवर याबाबत तक्रार करण्यात आली होती. यामध्ये गावातील एका घरात भूमिगत टँकमध्ये अवैधरित्या पेट्रोलियम पदार्थांची साठवण केली जात असल्याचं सांगण्यात आलं. तक्रारीनंतर प्रशासनानं घटनास्थळी एक पथक पाठवलं मात्र, त्यांच्या हाती फार काही लागलं नाही.

पुढं जिल्हाधिकारी अरविंद सिंह यांच्याकडे पुन्हा याबाबत तक्रार करण्यात आली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तातडीनं घटनास्थळी आणखी एक पथक पाठवलं. तिथं खोदकाम करत अकेर या पथकाला पेट्रोलियमसदृश्य द्रव पदार्थाचा भूमिगत टँक सापडला.

हा टँक तिथं आला कसा? घरमालक म्हणाले.. 

घरमालक उदयवीर सिंह यांचा मुलगा तेज सिंहच्या माहितीनुसार हे घर कुटुंबाती संयुक्त मालमत्ता असून, यामध्ये बलवीर सिंह आणि धर्मवीर सिंह या भावांचीही वाटणी आहे. आपण पेटी डीलर असून, हा त्याच काळातील टँर असल्याचं त्यांनी सांगितलं. बराच काळ याच्यामध्ये काहीच नसून तो तसाच पडून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इथं टँकमध्ये अल्कोहोल किंवा पेट्रोलियमसदृश्य गोष्ट असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

घरमालकांसमक्ष करण्यात आलेल्या खोदकामात 5000 लीटक क्षमता असणारा एक टँक/ टाकी सापडली. याशिवाय 75 लीटर डिझेलही सापडलं. यावर 2016- 17 मध्ये आपण डिझेल व्यवसाय करत होतो, जो आता बंद आहे असं कारण घरमालकांनी पुढे केलं. या संपूर्ण प्रकरणी आता त्या टाकीचे तीन नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले असून, मिळालेल्या द्रवामध्ये कोणतीही भेसळ किंवा तत्सम कृत्य केल्याची बाब सिद्ध झाल्यास पुढील कठोर कारवाई केली जाईल असं यंत्रणांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *