मुंबईसह उपनगरातील विविध भागात तब्बल 30 तास पाणी पुरवठा थांबवला जाणार; एक थेंबही पाणी येणार नाही

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई आणि उपनगरातील विविध भागात तब्बल 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 5 ते 6 मे दरम्यान पाणी पुरवठा थांबवला जाणार आहे. या दरम्यान एक थेंबही पाणी येणार नाही. या दरम्यान पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे उच्चस्तरीय जलाशय पर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेने हाती घेतली आहे. या अंतर्गत 1800 मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी व इतर पूरक कामे केली जाणार आहेत. संबंधित कामे

मंगळवार, 5 मे रोजी सकाळी 10 ते बुधवार,6 मे रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत केली जाणार आहेत. या 30 तासांच्या कालावधीत शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण आणि पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व, एम पश्चिम व एन विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.

पाणीपुरवठा विषयक कामे करण्यासाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा करणारी 1800 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि तुर्भे निम्नस्तरीय जलाशयाची 1200  मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, बुधवारी पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

1) एफ उत्तर विभाग – प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, शांती नगर, एच. एम. मार्ग, के. डी. गायकवाड नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, अल्मेडा संकुल (6 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार), शीव (पूर्व) व शीव (पश्चिम) (६ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार)

2) एफ दक्षिण विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशॉ पेटिट मार्ग, एस. एस. राव मार्ग, डॉ. एर्नेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग, एन. एम. जी. एस. मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग ,गोविंदजी केणी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, सेंट पॉल मार्ग, सेंट झेवियर मार्ग, खाशाबा मार्ग, महादेव पालव मार्ग, जिजीभॉय लेन, आचार्य दोंदे मार्ग, विठ्ठल चव्हाण मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बाटलीवाला गल्ली, चमार बाग मार्ग, आई माई मेरवानजी मार्ग, शिरोडकर मार्ग, चिवडा गल्ली, साने गुरुजी मार्ग, आनंद मालवणकर मार्ग, गॅस कंपनी गल्ली (6 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

3) एल विभाग – साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नवीन टिळक नगर (6 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार). कुरेशी नगर (कसाईवाडा)

6 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार) हिल मार्ग ,ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, डोंगर परिसर, पाटील गल्ली, गुलमोहर गल्ली, पंचशील नगर ( 5 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार). नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदिर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, कुर्ला कारशेड, रेल्वे वसाहत, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर ,एव्हरार्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा वसाहत, समर्थ नगर

5 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार.

4) एम पूर्व विभाग – लल्लूभाई संकुल, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, लोटस वसाहत, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशी नाका, मानखुर्द (6 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार) बैंगणवाडी, मानखुर्द, भारत नगर, म्हाडा इमारती, चिता कॅम्प, साठे नगर, झाकिर हुसेन नगर, देवनार गाव, देवनार वसाहत, न्यू भारत नगर, हशू अडवाणी नगर, नटवर पारेख संकुल (5 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार) सह्याद्री नगर, वाढवली गाव, बी. ए. आर. सी. वसाहत, कमला रमण नगर, रमण मामा नगर, डम्पिंग सप्लाय (5 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार) रफिक नगर, मंडाळा गाव, न्यू मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एल. यू. गडकरी मार्ग, आर. एन. ए. पार्क, कुकरेजा इमारती, वाशी नाका, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्हाडा इमारती, इंडियन ऑइल नगर (5 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार) बी. डी. पाटील मार्ग येथील रिफायनरी विभाग, एच. पी. सी. एल., बी. पी. सी. एल. ( 5 मे रोजी सकाळी 10 ते 6 मे रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)

5) एम पश्चिम विभाग – मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत, डब्लू. टी. पाटील मार्ग, मुक्ती नगर, काशिनाथ पाटील वाडी, संतोष नगर, केळकर वाडी, डायमंड गार्डन, सेंट्रल अव्हेन्यू मार्ग, एन. बी. पाटील मार्ग, जनार्दन पाटील मार्ग, घाटला गाव, एस. टी. ऍंथोनी मार्ग, चंद्रोदय सोसायटी, एस. जी. बर्वे मार्ग, चरई गाव, बोरला सोसायटी (५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार व 6 मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार) एम. एस. इमारत क्रमांक 1 – 32 (5 मे रोजी पहाटे 4 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *