उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड

मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा मतदाधिक्याचा विक्रम मोडीत काढत बारामतीमधील पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. 2 लाख 18 हजार 930 मतं मिळवून सुनेत्रा पवारांनी विजय मिळवला आहे. सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहेत. सुनेत्रा पवारांनी विजयी आघाडी मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवारांच्या नावावर सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड

बारामतीच्या पोटनिवडणुकीत 24 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना दोन लाख 18 हजार 930 इतकी मतं पडली आहेत. उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडला आहे. 2022 च्या पोटनिवडणुकीत सुनील कुमार शर्मांना दोन लाख 14 हजार 835 मते मिळाली होती. 24 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीत दोन लाख 18 हजार 930 मते मिळाली आहेत.

सुनेत्रा पवारांनी मोडला बारामतीमधील अजित पवारांचा सर्वाधिक मताधिकाऱ्याचा विक्रम

2019 मधील अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवारांनी मोडला आहे. सुनेत्रा पवार यांना 19 व्या फेरी मध्ये 1 लाख 68 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. 2019 मध्ये अजित दादांना एकूण 1 लाख 65 हजारांचे होते मताधिक्य बारामती पोटनिवडणुकीच्या एकूण 24 फेरींपैकी 19 फेरीत त्यांनी हा विक्रम मोडला.

मन भरुन येत आहे, पण…

विजयी आघाडी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवारांनी, “या विजयी आघाडीनंतर त्यांनी आज मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी, “दादांनंतरची ही पहिली निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशाप्रकारे निवडणूक लढवावी लागेल. मन भरुन येत आहे. पण आज बारामतीकरांनी जो दादांवर विश्वास दाखवला आहे. बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतिक म्हणून भावांजली वाहिली आहे. मतदान हे दादांवर दाखवलेला विश्वास, बारामतीकरांची केलेली सेवा आणि जनतेवरचं प्रेम यासंदर्भातील हे मतदान आहे,” असं मत व्यक्त करत बारामतीकरांचे आभार मानले.

…म्हणून बारामतीकरांनी हे मतदान केलं

“विकासाचा वादा, वहिनी आणि दादा” अशी चर्चा सोशल मीडियावर आहे, असं मत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुनेत्रा पवारांनी, “बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलं आहे त्यांनी दादांवरील विश्वास माझ्या पाठीशी उभा केला आहे. दादांना आदरांजली वाहतना माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी मतदारांचे आभार मानते. त्यांनी जे मतदान केलं आहे. दादांवरचं प्रेम आणि माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. आजपर्यंत बारामतीकरांना अजित पवारांनी विकासाची स्वप्न दाखवली आहेत. ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे. ती पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय म्हणून त्यांनी हे मतदान केलं आहे,” असं म्हटलं आहे.

…म्हणून जल्लोष साजरा करु नका असं आवाहन

विजयानंतर जल्लोष साजरा करु नका, असं आवाहन तुम्ही समर्थकांना केलं आहे म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना सुनेत्रा पवारांनी, “खरं तर अशी निवडणूक बारामतीकरांना नको होती. त्यांनी मतदान केलंय ते विश्वास, प्रेम आणि दादांप्रतीची भावना यातून व्यक्त केली आहे. हे मत अनुभवायचं आहे. ही जल्लोषाची निवडणूक नाही. ही एकप्रकारची सगळ्यांनी दिलेली आदरांजली आहे. बारामतीकरांचं हेच मत आहे. काही लोकांना उत्साह वाटतो. हा विजय दादांना वाहिलेली आदरांजी आहे. दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती तेच दाखवावं अशी इच्छा आहे,” असं उत्तर दिलं.

आभार सभा घेणार का?

“बारामती हे माझं कुटुंब आहे. माझं संपूर्ण कुटुंब यात आहे,” असं आपल्या यशाबद्दल बोलताना सुनेत्रा पवारांनी म्हटलं. बारामतीमध्ये आभार सभा घेणार का? या प्रश्नावर, “मी बारामतीला जाणार आहे. अशा अचानक झालेल्या आघातामुळे मी अशी समोर उभी राहील. जनतेनं टाकलेलं विश्वास, बारामतीकरांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,” असं उत्तर सुनेत्रा पवारांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *