नंदुरबारच्या नवापूरमध्ये पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून तीन पोल्ट्री फार्म सील केलेत. शिवाय इतर पोल्ट्री फार्मचीही जिल्हा प्रशासनानं तपासणी सुरु केलीये.
पोल्ट्री हब म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. नवापूरमधील तीन पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्या कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता तिथं बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हाधिका-यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत 1 लाख 40 हजार कोंबड्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं नष्ट करण्याचे आदेश दिलेत. शिवाय पाच किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलाय.
कोंबड्या शास्त्रशुद्धपणे नष्ट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं काही पथकं तयार केलीयेत. ही पथकं परिसरातील पाहणी आणि प्रत्यक्ष कलिंग करणार असल्याचं सांगण्यात येतंय. नंदुरबार परिसरात पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
नंदुरबारमध्ये 19 वर्षात तिस-यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव बर्ड फ्लूची लागण झाल्यानं 10 लाख अंडी उत्पादन प्रभावित नंदुरबारमधून मुंबई, अहमदाबाद, बडोदा, नाशिकध्ये अंडी पुरवठा दररोजच्या 5 ते 8 हजार कोंबड्यांच्या विक्रीवर परिणाम प्रशासनानं खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्या पोल्ट्री फार्ममध्ये तपासणी करण्याचे आदेश दिलेत. नवापूरच्या त्या तीन पोल्ट्री वगळता कुठंही बर्ड फ्लू संशयित पक्षी आढळलेले नाहीत.
प्रशासनानं वेगानं उपाययोजना केल्यात. त्यामुळं बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशी अपेक्षा पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकरी बाळगून आहेत.
