महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वीच्या (HSC) आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल 89.79 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुली अव्वल ठरल्या आहेत. तर कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागातील बारावीचा निकाल ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांना दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
या वेबसाइटवर पाहा निकाल!
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in
असा तपासा निकाल!
बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर होमपेजवर ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचा Roll Number आणि आईचे नाव टाका.
‘Submit बटण दाबताच तुमचा निकाल स्क्रीनवर पाहिला मिळेल.
त्यानंतर निकालाची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या.
महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल पाहण्यासाठी हे आहेत 4 पर्याय
– अधिकृत वेबसाइट्स : mahresult.nic.in किंवा hscresult.mkcl.org
– SMS सेवा : MHHSC <Seat No> टाईप करून 57766 वर पाठवा आणि निकाल पाहा.
– DigiLocker: डिजिटल मार्कशीटसाठी डिजीलॉकर ॲपवरही सोय
– UMANG ॲप: केंद्र सरकारच्या उमंग ॲपवर ‘HSC Result’ सेक्शनमध्ये जाऊन निकाल तुम्ही पाहू शकता.
बारावीचा निकाल डिजीलॉकर (DigiLocker) वरही पाहता येणार
विद्यार्थ्यांना बारावीचा निकालाची त्यांची डिजिटल मार्कशीट डिजीलॉकरवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करून डिजीलॉकर ॲप किंवा वेबसाइटवरून मार्कशीट डाऊनलोड करता येणार असून ही इतर कामांसाठी अधिकृत मानली जाणार आहे.
