चिमुरड्याच्या मृत्यूनंतरही धोकादायक वाहतूक जैसे थे

चिमुरड्याच्या मृत्यूनंतरही धोकादायक वाहतूक जैसे थे

विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या नाशिकच्या सेवाकुंज चौकात पालकांनी पुन्हा रास्ता रोको केला. बुधवारी या चौकात रोनित चव्हाण या चिमुरड्याचा बळी गेला होता.

रोनितचा बळी जाऊनही या चौकातील धोकादायक वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं नाही. वाहतुकीचं नियोजन करण्यात प्रशासन दिरंगाई करत असल्यानं पालक प्रचंड संतप्त झाले आणि आज सकाळी पुन्हा रस्त्यावर उतरले. निमाणी-औरंगाबाद नाका रस्ता रोखून धरला.

सेवकुंज चौकात एकूण पाच शाळा आहेत. शेजारी बसस्थानक आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून जीव मुठीत घेऊन जावं लागतं. रोनितच्या मृत्यूनंतरही या ठिकाणी बंद पडलेला सिग्नल चालू करण्यात आला नाही. त्यामुळं पालक चांगलेच संतप्त झाले आहेत.

संध्याकाळी शेकडो चिमुरड्यांनी कँडल मार्च काढला. रोनितसारखा मृत्यु आम्हाला नको, असे म्हणत वाहतूक प्रशासन आणि देवाला आर्त हाक मारली. त्यावेळी सारं वातावरण भावूक झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *