मानसिक अवस्था बिघडलेला उच्चदाब नशेतील एक व्यक्ती सोमवारी (२७एप्रिल) रात्री निगडी-यमुनानगर परिसरातील अति वीजवाहिनीच्या टॉवरवर चढला होता. याची माहिती मिळताच तीन तासांच्या थरारक नाट्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली.
विजेच्या टॉवरवर रात्री व्यक्ती चढला
चिकन चौक येथील विजेच्या टॉवरवर रात्री सव्वानऊच्या सुमारास एक व्यक्ती चढल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या वेळी संबंधित व्यक्ती टॉवरच्या शिखरावर उभा राहून कसरत करीत असल्याचे दिसून आले. नागरिक त्याला खाली येण्याची विनंती करीत होते; परंतु तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. एक जण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
जॉइंट खाली फेकण्याचा प्रयत्न केला
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तातडीने ५५ मीटर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उंचीची ब्रांटो स्काय लिफ्ट मागवून बचावकार्य सुरू केले. रेस्क्यूदरम्यान संबंधित व्यक्तीने टॉवरवरील अर्थिंगचा जॉइंट खाली फेकण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवानांनी टॉवरवर चढून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने ब्रांटो स्काय लिफ्टच्या साह्याने बचावकार्य सुरू ठेवले आणि अखेर जवानांनी संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली आणले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रतिबंधित ठिकाणी जाणे टाळावे
‘अशा प्रकारच्या घटनांमध्ये बचावकार्य करताना अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहते. नागरिकांनी धोकादायक कृती टाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. विशेषतः हाय टेन्शन टॉवर्स, उंच इमारती किंवा प्रतिबंधित ठिकाणी जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ माहिती दिल्यास जलद आणि प्रभावी मदत पोहोचवणे शक्य होते,’ असं पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अग्निशमन विभागाचे उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितलं.
पुण्यात भाजप कार्यकर्त्याला गोळ्या झाडून संपवलं
पिंपरी-चिंचवडच्या देहूरोड परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेत भाजपचा कार्यकर्ता रमेश रेड्डी याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
