मुंबई महापालिकेत लव्ह, S*x और धोखा… विवाहित अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी बैठकीतून उचललं, नोकरीही जाणार?

देशातीलच नाही तर आशियामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत प्रेमप्रकरणासंदर्भातील एक विचित्र घटना समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विवाहित असूनही महापालिकेमधील महिलेला लग्नाचं अमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सध्या महानगरपालिकेमध्ये याच प्रकरणाची चर्चा असून मागील काही काळामध्ये अशाप्रकारे कारवाई झालेला हा पहिलाच अधिकारी ठरला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि घडलंय काय हे जाणून घेऊयात…

कोण आहे हा अधिकारी?

महापालिकेशीसंबंधित महिला आर्किटेक्टला लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील एका सहायक आयुक्तांना सोमवारी बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नितीन चंद्रप्रताप शुक्ला असं या सहायक आयुक्तांचं नाव असून ते 37 वर्षांचे आहेत. नितीन हे के-ईस्ट म्हणजेच अंधेरी पूर्व आणि विले पार्ले पूर्वचे बीएमसी वॉर्ड अधिकारी आहेत. आगामी जनगणनेच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर नितीन यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पीडितने तक्रारीत काय म्हटलंय?

शुक्ला हे इमारत प्रस्ताव विभागात उप-अभियंता असताना तक्रारदार महिलेला भेटले होते. रविवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 2023 मध्ये एका प्रकल्पाशी संबंधित मंजुरीसाठी ती त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे तिच्यासोबत संबंध निर्माण झाले. विशेष म्हणजे शुक्ला हे विवाहित आहेत. मात्र शुक्ला यांनी तिला आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन दिल्याचे म्हटले जाते. तक्रारदाराने अनेक गंभीर गुन्ह्यांअंतर्गत शुक्लांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये शारीरिक हल्ल्याबरोबरच बनावट खाती तयार करण्याचा आरोपही केला आहे. त्याचप्रमाणे आमच्या दोघांमधील खाजगी मजकूर शुक्ला यांनी प्रसारित केल्याचा आरोपही या पीडितेने केला आहे. मजकूर प्रसारित करुन माझी बदनामी करण्याची धमकी त्यांनी दिलेली असंही पीडितेने म्हटलं आहे.

नोकरी जाण्याची शक्यता

शुक्ला यांना मंगळवारी विक्रोळी न्यायालयात हजर केले जाईल. पालिका अधिकाऱ्यांनी विभागीय कारवाई होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत आणि 48 तास कोठडीत राहिल्यास त्यांना निलंबनाचा सामना करावा लागू शकतो.

अन्य एक अधिकारी जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित

राज्य महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी उमेश बिरारी यांना निलंबित केले आहे. ते सध्या ठाणे महानगरपालिकेत उप महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. उपविभागीय अधिकारी असताना बोरिवली येथील जमिनीच्या तुकड्यांऐवजी फ्लॅट्सच्या विक्री व्यवहारांच्या आधारे चुकीचे मूल्यांकन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बिरारी 2023 मध्ये टीएमसीमध्ये रुजू झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *