ICU बेड नसल्याने स्ट्रेचरवर ठेवलं, उपचारावेळी खाली पडल्याने लेकीचा मृत्यू, कूपर हॉस्पिटलवर कुटुंबाचे आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित असताना कूपर हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत दोन रुग्णांचा आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एका तरुणीचा स्ट्रेचरवरुन पडून, तर दुसऱ्याचा ‘आयसीयू’त बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप दोन्ही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.

गोरेगावकर तरुणीला पोटदुखी

गोरेगाव येथे राहणाऱ्या संध्या यादव (२७) हिला शनिवारी सकाळी तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचार देऊन तिला घरी पाठवण्यात आले. त्याच दिवशी रात्री तिला पुन्हा तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्ट्रेचरवरुन खाली पडली

‘आयसीयू’मध्ये बेड नसल्याचे सांगून डॉक्टरांनी स्ट्रेचरवर ठेवून तिच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती तिचे काका राजेंद्र यादव यांनी दिली. उपचारादरम्यान ती खाली पडल्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला. तेव्हा ‘आयसीयू’बाहेर बसलेल्या तिच्या पालकांना संध्या खाली पडल्याचे दिसले. त्यांनी मुलीकडे धाव घेतल्यावर डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.

मुलीच्या काळजीने व्यथित झालेल्या पालकांनी तिला नेमके काय झाले आहे याची वारंवार विचारणा करुनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर पालकांनी तिचे काका राजेंद्र यांना बोलावून घेतले. त्यांनाही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *