घटस्फोटानंतर 38 वर्षीय प्रियकराचे 22 वर्षीय तरुणीशी सूत जुळलं, चारित्र्याच्या संशयातून लॉजवर जीव घेतला, लोणेरेतील घटनेचा उलगडा

 रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील ३८ वर्षीय आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले. रविवारी त्याला अलिबाग येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तरुणीवर अत्याचार करुन खून

लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये २० एप्रिल रोजी एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अनिस हा मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील तळवडे मालदारवाडी येथील रहिवाशी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी रायगड, रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथे पथके तैनात करण्यात आली होती.

घटस्फोटानंतर वर्षभरापासून पीडितेशी प्रेमसंबंध

या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालदारने असा दावा केला आहे की, पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर गेल्या वर्षापासून त्याचे पीडितेशी प्रेमसंबंध होते. पीडितेचे इतरही अनेकांशी संबंध असल्याचा संशय त्याला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *