32 वर्षीय पत्नीचे शिक्षकाशी अनैतिक संबंध, 45 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, संपत्तीसाठी छळाचा आरोप

संपत्ती व घटस्फोटासाठी होणारा मानसिक छळ असह्य झाल्याने पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्याची अखेर केली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृत पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शीलरत्न भीमराव बेलेकर (वय ४५, रा. वाघदरा, इसासनी), असे मृताचे नाव आहे. ते प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तर पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) व तिचा प्रियकर महेश मेश्राम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

घटस्फोट व संपत्तीची मागणी

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आरोपी महेश हा शिक्षक आहे. दोन वर्षांपासून रुचिकाचे महेशसोबत अनैतिक संबंध आहेत. याची शीलरत्न यांना माहिती मिळाली. त्यानंतर रुचिका या शीलरत्न यांना घटस्फोट व संपत्तीची मागणी करून त्यांचा मानसिक छळ करू लागल्या. ‘तू मरून जा’ असे त्या नेहमी शीलरत्न यांना म्हणायच्या. महेशही त्यांना त्रास द्यायचा.

तलावात बॉडी सापडली

फेब्रुवारीत शीलरत्न हे त्यांचा भाऊ अजय भीमराव बेलेकर (वय ४९, रा. कामगार कॉलनी) यांच्याकडे आले. काही वेळाने ते घरून निघाले. त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. अजय यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात शीलरत्न बेपत्ता असल्याची तक्रार दिली. २४ फेब्रुवारीला अंबाझरी तलावात शीलरत्न यांची बॉडी आढळून आली.

दोघांवर जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा

या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी तपास केला. तपासादरम्यान रुचिका व महेश या दोघांच्या छळाला कंटाळून शीलरत्न यांनी जीव दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *