लग्न हे एक पवित्र आणि प्रेमाचं बंधन असतं. दोन जीवाचं मिलन मानलं जातं. नवरा – बायकोमधील प्रेम, विश्वास आणि कर्तव्याचे हे नातं म्हणजे त्यांचं छोटं सुखी संसार त्यांचं एक जग असतं. पण अनेक वेळा नवऱ्याकडून बायकोला होणारी मारहाण, हुंडावरुन छळ असे अनेक कारणामुळे बायकोसाठीचं तिचं जग एका नरकासारखं असतं. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात पत्नी पतीला निर्दयपणे मारताना दिसत आहे. पत्नी ही पतीसाठी सर्वस्व असते. पण पत्नीचं हे असं रुप पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने या नात्याची एक वेगळी बाजू जगासमोर आणली आहे. पत्नीचे क्रूरतेचा व्हिडीओ त्या पतीने आपल्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्याच्यासाठी घरात पत्नी कशी क्रूरतेने वागते याचं पर्दाफाश केलं. गेल्या दोन वर्षांपासून पत्नीमुळे हा व्यक्ती हैराण झाला आहे. घरात त्याला पत्नीकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागतोय. शेवटी सहनशक्ती संपल्यानंतर त्याने हा व्हिडीओ काढून जगासमोर त्याच्या पत्नीचे क्रूर उघड केलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी कमेंट करत आहे की, लग्न करण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराला हवा. हा व्हिडीओ @VishalMalvi_ नावाच्या वापरकर्त्याने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, तो माणूस गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पत्नीकडून होणाऱ्या हिंसेचा सामना करत आहे. अखेरीस, पुरावे गोळा करण्यासाठी त्याने आपल्या लॅपटॉपचा कॅमेरा चालू करून हा व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओमध्ये ती महिला आपल्या पतीवर ओरडताना, त्याला कानशिलात मारताना आणि रागाने त्याचे केस ओढताना स्पष्टपणे दिसून येत आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे की, आता लग्नाबद्दल भीती वाटत आहे. इतरांनी याला “घरगुती दहशतवाद” असंही संबोधलं आहे. अनेकांनी त्या महिलेच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध देखील केला आहे. काही लोकांनी म्हटलंय की, एखाद्या पुरुषाने असं केलं असतं तर तो आतापर्यंत तुरुंगात गेला असता. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये पुरुषांच्या आवाजाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. यावरही लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
या घटनेमुळे इंटरनेटवर ‘स्त्रीवाद’ आणि ‘समान हक्क’ यावर एक नवीन चर्चा सुरू यात मात्र काही शंका नाही. समाजाची मानसिकता झाली आहे. एखाद्या महिलेला रस्त्यावर मारलं तर तो पुरुष निर्दय आहे. तसंच जर एका महिलेने पुरुषाला मारलं तर आपण म्हणतो नक्कीच त्याने काहीतरी केलं असेल. पण प्रत्येक वेळी पुरुषांचीच चूक असते असं नाही. या व्हिडीओमध्ये दिसते अशा महिलादेखील या जगात आहेत, ज्यामुळे पुरुष वेदनादायी आयुष्य व्यतीत करत असतात.
