27 एप्रिलपासून उन्हाळी सुट्टीची घोषणा; सरकारी आणि खाजगी शाळा राहणार बंद

दा भारतात सर्वत्र तीव्र उष्णतेची लाट पाहिला मिळतेय. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी यंदा उन्हाळा सुट्टीची घोषणा लवकर करण्यात आली आहे. ओडिशा सरकारने 27 एप्रिलपासून राज्यातील सरकारी आणि खाजगी शाळांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शालेय व जनशिक्षण (SME) विभागाने सादर केलेल्या उन्हाळी सुट्ट्या लवकर सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मंजुरी दिलीय.

हवामान खात्याचा दिलेल्या इशारानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक संस्था लवकर उन्हाळी सुट्टीची घोषणा केली आहे.  लवकर उन्हाळी सुट्टी जाहीर झाली असली तरी सरकारने स्पष्ट केलं आहे की, परीक्षा नियोजित वेळेनुसारच घेतल्या जाणार आहे. याशिवाय, सुरू असलेल्या शालेय परीक्षा आणि जनगणनेचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत.

ओडिसामध्ये शाळांना साधाणार उन्हाळी सुट्टी ही 25 मे किंवा 1 जूननंतर लागतात. पण राज्यातील तीव्र उष्णतेमुळे ओडिशा सरकारने 27 एप्रिलपासून उन्हाळी सुट्टीचा प्रस्ताव दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान आधीच 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलंय. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश चंद्र पुजारी यांनी अंगणवाडी केंद्रे लवकरच बंद केले जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *