ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांना फटका; देवगिरी, नंदिग्राम एक्स्प्रेस व्हाया पुणे मार्गे धावणार

ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईहून मराठवाड्याकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. याशिवाय मराठवाड्यातूनही मुंबईकडे प्रवासी जात आहे. २५ आणि २६ एप्रिलला खर्डी यार्ड रिमॉडेलिंगचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले असून या कामामुळे देवगिरी, नंदिग्राम एक्स्प्रेस व्हाया पुणे मार्गे धावणार आहे. तर राज्यराणी एक्स्प्रेसला मनमाडपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून कल्याण-कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामाशी संबंधित खरडी यार्ड रिमॉडेलिंग कामे करण्यात येणार आहे. या कामांसाठी २५ एप्रिल आणि २६ एप्रिल २०२६ (शनिवार/रविवार) या दोन दिवसांसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे खालील रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

राज्यराणीला फटका

२४ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १७६११ हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावेल. मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली आहे.

२५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हजूर साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड येथून प्रारंभ (शॉर्ट ओरिजिनेट) होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड दरम्यान अंशतः रद्द केली आहे.

मार्ग बदल (डायव्हर्जन)

२५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक ११००१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वे कल्याण – कर्जत – पुणे – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.

२५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १७०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -लिंगमपल्ली-देवगिरी एक्स्प्रेस ही गाडी कल्याण – लोणावळा- पुणे – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.

Mumbai Metro तिकीट आता रॅपिडोवरही

मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दिशेने ‘एमएमआरडीए’ने आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता महा मुंबई मेट्रोचे तिकीट रॅपिडो अ‍ॅपवरही एका टॅपमध्ये घेता येणार आहे. त्यामुळे मेट्रो तिकीट खरेदीसाठी एकूण १६ अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी स्थानकांवरील तिकीट रांगांमध्ये उभे राहण्याची गरज कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *