तिसऱ्या मुंबईत खरात पसरवत होता हात-पाय; चिंचोक्यांच्या दरात उरणमध्ये घेतलेला कोट्यवधींचा भूखंड

महिलांवरील अत्याचार आणि फसवणूकप्रकरणी अटकेत असणआऱ्या भोंदू खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार असतानाच त्याच्यावर नोंदवण्यात आलेल्या सहाव्या गुन्ह्याची चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये न्यायालयात एसआयटीकडून खरातच्या कोठडीची मागणी केली जाणारा आहे. गुंगीच्या औषधाचा फॉर्म्युला मिळवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान खरातच्या नावे आणखी एका प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला असून, त्याची ही वक्रदृष्टी थेट मुंबई, तिसऱ्या मुंबईपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

तिस-या मुंबईत हात-पाय पसरवण्याचा खरातचा डाव

अशोक खरातला पोलिसांनी 17 मार्च रोजी अटक केली. त्याच दिवशी नवी मुंबईनजीकच्या उरणमधील जमीन व्यवहाराप्रकरणाची वर्दी नोटीस जारी करण्यात आली. आरोपी पोलीस कोठडीत असताना त्याच्या मालमत्तेची प्रक्रिया सुरू राहण्याची बाब अनेक शंकांना वाव देऊन गेली. उपलब्ध माहितीनुसार तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पातही खरातनं हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. खरातकडून उरणमध्येही स्वस्तात जमीन खरेदी करण्यात आली. जिथं, उरणमधील चाणजे गावात 58 लाख 50 हजारात त्यानं जमीन खरेदी केली.

प्रत्यक्षात या जमिनीचा बाजारभाव 3 ते 4 कोटी असताना त्यानं मात्र प्रचंड स्वस्त दरात ही जमीन खरेदी केली. येत्या काळात तिसऱ्या मुंबईच्या व्याप्तीमुळं या भागाच वाढणारे भूखंड दर पाहता खरातनं इथंही गुंतवणूक केल्याचं तपासाला मिळालेल्या दिशेनं आता स्पष्टच झालं आहे. खरातच्या अटकेच्या दिवशीच व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध झासी आणि तो कोठडीत असताना महिनाभरात 13 एप्रिलला फेरफाराची नोंद मंजूरही झाल्यानं त्याच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भूखंड खरेदी किंवा तत्सम व्यवहारांसाठी जिथं सामान्य नागरिकांना वारंवार येरझऱ्या मारायला लागतात तिथंच महसूल विभागानं या खरातसाठी मात्र महिन्याभरातच प्रक्रिया आटोपल्याची माहिती सूत्रांमार्फकत मिळत आहे. ज्यामुळं महसूल विभागाच्या कारभारासमवेक काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्याच अडकल्याचं चित्र आहे. उरणमधील जमीन व्यलहार आणि प्रशासकीय साथ पाहता एसआयटीकडून या व्यवहाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *