मंदाताई आमटे उपचारासाठी रांगेत

मंदाताई आमटे उपचारासाठी रांगेत

एखादी मोठी व्यक्ती किती साधी असु शकते, याचा प्रत्यय नागपूरच्या मेडिकल कॉलेज-रुग्णालयाला डॉ. मंदाताई आमटे यांच्या रूपाने आला. गडचिरोलीतील आदिवासींच्या आरोग्यासाठी आयुष्य वेचणा-या मंदाताई तब्येत तपासण्यासाठी नागपूरला आल्या.

सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांनी रांगेत उभे राहून कार्ड काढले, रेडिओलोजी विभागात जाऊन ‘एमआरआय’ काढून घेतला. मंदाताईंसोबत स्वत: डॉ. प्रकाश आमटे आणि सारा आमटे होत्या. विशेष म्हणजे, प्रकाश आमटे आणि मंदाताई यांचे वैद्यकीय शिक्षण याच मेडिकलमध्ये झाले आहे, मात्र आपण येत असल्याची माहिती त्यांनी कुणालाही दिली नव्हती. त्यामुळे नंतर त्यांची ओळख पटली तेव्हा डॉक्टरवर्गही अवाक् झाला.

ओटीपोटात दुखत असल्याने मंदाताई यांनी नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीत ‘एमआरआय’ची सोय नसल्याने भामरागडहून गुरुवारी सकाळी त्यांना नागपूरला आणण्यात आले. त्यांचे आगमन रुग्णालय परिसरात हा कौतुकाचा विषय बनला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *