नाशिकमधील अशोक खरात या भोंदूबाबा प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार उघड झाला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी गावमध्ये हा धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीदायक वातावरण आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी गावमध्ये लोकनियुक्त सरपंचने राजीनामा दिल्याने सरपंचपदासाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाकडून राजू वजीर निवडणूक लढवत आहेत. प्रचाराचा धडाका उडालेला असताना वजीर यांचा फोटो एका काळ्या कापडात ठेवून काळी बाहुली, लिंबू, केळी, हळद कुंकु लावून हे सर्व साहित्य रस्त्याच्याकडेला ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी जन सुराज्य शक्ती पक्षाकडून राजू वजीर निवडणूक रिंगणात आहेत. परदेशात शिक्षण घेतलेल्या यशोधरा महेंद्रसिंह शिंदे या २१ वर्षीय तरुणीने वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजय मिळवला होता. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून शर्थीची प्रयत्न सुरु आहे. पण धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत विजयासाठी काळी जादू म्हणजे भानामतीचा प्रकार केल्याच समोर आलं आहे. सांगलीतील या भानामती घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधकांनी सरपंचपदाचे उमेदवार राजू वजीर यांचा फोटोसोबत भानामती प्रयोग केल्याच उघड झालं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, वजीर यांच्या फोटोसोबत काळी बाहुली, केळी, लिंबू हळद-कुंकू, लिंबाला सुया टोचून एका कापड्यावर ठेवण्यात आलं होतं.
गावातील या भानामतीचा प्रकार माजी उपसरपंच कल्लपा नाईक यांना कळला. त्यानंतर वजीर यांच्या समर्थकांनी हे सर्व साहित्य पेट्रोलने जाळून टाकले अशी माहिती कल्लपा नाईक यांनी दिली आहे. वजीर यांचा विजय निश्चित असताना विरोधकांनी घाबरून हे कृत्य केल्याचा आरोप वजीर यांच्या समर्थकांनी केला आहे.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगली अध्यक्ष राहुल थोरात या घटनेचा निषेध केला आहे. भानामती सारखे केले जाणारे प्रकार हे केवळ अंधश्रद्धा आहे. असे प्रकार करुन ते समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी करतात. राहुल थोरात यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, अशा कोणत्याही भानामतीच्या प्रकाराला घाबरून जाऊ नये, असं सांगितलं आहे. तर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायद्यांतर्गत व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे.
