मुंबई शहर ही देशाची आर्थिक राजनाधानी असली, शहरात अनेक उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था असल्या तरीही याच मुंबईतील काही शैक्षणिक संस्थांमुळं विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात येण्याची भीती निर्माण झाली आहे. अतिशय झपाट्यानं पुढे जाणाऱ्या मुंबई शहरात सध्याच्या घडीला तब्बल 164 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं ही बातमी विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढवणारी ठरत आहे.
अनधिकृत शाळांपैकी 48 शाळांना राज्य सरकारकडून अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महापालिकेकडूनही यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला असला तरीही अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. ऑक्टोबर 2025 पासून मंजुरीची प्रतीक्षा लागली असून, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. ज्यामुळं नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीआधी याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्राथमिक माहितीनुसार चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, मालाड मालवणी इथं शहरातील सर्वाधिक अनधिकृत शाळा आहेत.
नेमक्या कोणत्या ठिकाणी किती अनधिकृत शाळा? पाहा यादी
क्रॉफर्ड मार्केट – 1
मुंबई सेंट्रल – 1
वडाळा – 3
अँटॉप हील – 3
धारावी – 9
माटुंगा – 1
सायन – 1
सांताक्रूझ – 1
जोगेश्वरी – 7
कुर्ला – 5
अंधेरी – 5
घाटकोपर – 1
पवई – 1
गोवंडी – 43
मानखुर्द – 16
ट्रॉम्बे – 5
चेंबूर – 4
विक्रोळी – 9
मालवणी – 15
मालाड – 9
दिंडोशी – 1
गोरेगाव – 4
बोरीवली -3
दहिसर – 2
कांदिवली – 12
कांजूरमार्ग – 1
भांडूप – 1
