कल्याणजवळ एक अत्यंत भीषण अपघात झाला असून मोठी जीवितहानी झाली आहे. कल्याण मुरबाडदरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पांजरा पुलावर झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या इको गाडीला सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली. इको गाडीमध्ये बसलेल्या 12 पैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी 11 वाजून 15 मिनिटींनी घडला.
इको गाडीमधून मुरबाडमधील काही रहिवाशी कल्याणच्या दिशेला जात असताना हा अपघात झाला. या अपघातामधून एक वयस्कर महिला आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.
