राज्यात अखेर दुष्काळ जाहीर, साडे चौदा हजार गावात दुष्काळ

राज्यातील बहुसंख्या गावांची स्थिती पाहता अखेर फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यातील १४ हजार ७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करत असल्याची घोषणा सरकारने केली.

या सर्व गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आहे. त्यामुळे इथे दुष्काळ जाहीर करण्यात आला.

दुष्काळासाठी उपाययोजना

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करतानाच दुष्काळी उपाययोजनाही जाहीर केली आहे. यानुसार

– कृषी पंपांच्या चालू वीज बिलामध्ये ३३.५ टक्के सवलत
– शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
– कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करणार

चौदा हजार 708 गावांतील हंगामी पैसेवारी कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *