काँग्रेस नेते मदन पाटील यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते मदन विश्वनाथ पाटील यांचे शुक्रवारी मुंबईत आजारपणाने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.

यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

मदन पाटील यांनी सांगली जिल्ह्यातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे ते दिग्गज नेते होते. सांगली लोकसभा मतदारसंघातून ते दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

त्याआधी त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली होती. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते मंत्रीही होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते नातू होते. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातील दुसरे वजनदार नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.आर.पाटील यांचे कर्करोगाने निधन झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *