कुर्ल्यात सिलेंडर स्फोटात आठ ठार

कुर्ला येथील सिटी किनारा या हॉटेलमध्ये झालेल्या  सिलेंडर स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला.  या स्फोटामुळे हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

काही जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुर्लामध्ये होली क्रॉस रुग्णालयाजवळ असलेल्या सिटी किनारा रेस्टॉरंटमध्ये दुपारी दोनच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे हॉटेलला भीषण आग लागली. घटनास्थळी अग्नीशामक दलाचे पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *