कॉल ड्रॉपवर मिळणार नुकसानभरपाई

मोबाईलवरुन तुमचे संभाषण सुरु असताना मध्येच कॉल कट झाला, तर यापुढे कॉल ड्रॉपसाठी मोबाईल कंपन्यात तुम्हाला एक रुपया नुकसान भरपाई देणार आहेत.

पुढच्यावर्षी एक जानेवारी २०१६ पासून कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना एक रुपयाची नुकसान भरपाई दिली जाईल. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सर्व मोबाईल कंपन्यांना कॉल ड्रॉपवर नुकसान भरपाई बंधनकारक केली आहे.

प्रीपेड ग्राहकांच्या मोबाईलवर कॉल ड्रॉपची समस्या उदभवली तर, चार तासांच्या आत त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी आणि महिन्याचे बिल भरणा-या पोस्ट पेड ग्राहकांच्या महिन्याच्या बिलामध्ये ही रक्कम जमा करावी असे ट्रायने मोबाईल कंपन्यांना आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि मोबाईल सेवा पुरवठादारांना सेवेचा दर्जा सुधारावा लागेल असे ट्रायने म्हटले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीवर बारीक लक्ष ठेवले जाईल आणि सहा महिन्यांनी आढावा घेतला जाईल असे ट्रायने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *