सिंगल असल्याचं भासवून फ्लर्ट, WhatsApp ग्रुपवर प्लॅन, आठ तरुणींशी जवळीक, नाशिकच्या MNC मध्ये धर्मांतराचं जाळं

बहुराष्ट्रीय कंपनीत धार्मिक कट्टरतेचे एक भयानक जाळे सक्रीय असल्याचे समोर आले आहे. विशिष्ट धर्माच्या तरुण-तरुणींनी एकत्रित येत इतर धर्मीय तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची योजना आखली. ती यशस्वी करण्यासह धार्मिक कट्टरतेसाठी व्हॉट्सॲपवर एक खास गट कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.

आठ तरुणींसोबत जवळीक

नाशिकमध्ये एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत जवळीक साधून एकीवर अत्याचार, तिच्यासह एका तरुणावर बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नऊ गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांत आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी, दानिश शेख ‘एसआयटी’च्या कोठडीत असून, निदा खान हिचा शोध सुरू आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीत विशिष्ट धर्मातील तरुण-तरुणींचा व्हॉट्सॲप ग्रुप सक्रीय होता. त्यावर कंपनीतील गटबाजीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असे. कदाचित त्यातूनच ‘पुढचे लक्ष्य काय’ हे ठरत असावे, असा कंपनीतील पीडित तरुणींना संशय आहे.

गंभीर बाब म्हणजे, ज्या तरुणींना जाळ्यात ओढले जायचे, त्यांचा पुन्हा स्वतंत्र व्हॉटसॲप ग्रुप तयार होत असे. यापूर्वी एका तरुणीने ‘त्या’ गटात काम केले. मात्र, कामानिमित्त तिने एका मोठ्या शहरात बदली करून घेतली. फक्त तरुणच नव्हे, तर तरुणीही या कृत्यात सहभागी असल्याने कट आखून विनयभंग, अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा संशय ‘एसआयटी’ तपासात व्यक्त होत आहे.

‘फ्लर्टिंग, जेवण आणि…’

संशयित कंपनीत कायमच ‘सिंगल’ असल्याचे दर्शवून तरुणींसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. तरुणींचे कौतुक करून, गोड बोलून त्यांच्यासोबत ‘फ्लर्टिंग’ करायचे. नंतर त्यांना जेवणासाठी बाहेर नेत.

‘बदली करून देतो…’

तरुणींसोबत संशयित सातत्याने चर्चा करून त्यांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे. ‘तुला रजा मिळवून देतो. तुझी ऐच्छिक ठिकाणी बदली करून देतो,’ असे सांगत सलगी करायचे. ज्या तरुणी मदत घेण्याचा प्रयत्न करायच्या, त्यांना जाळ्यात ओढले जायचे. मात्र, बहुतांश तरुणींनी वेळीच संशयितांचा हेतू ओळखून त्यांना झिडकारले. काही तरुणींनी नोकरीचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी, दानिश शेख मुख्य सूत्रधार शफी याने अनेक तरुणींची छेड काढली निदा खान हिने तरुणींसोबत सलगी करण्यासाठी इतरांना मदत केली निदा हिने तरुणींना ‘हिजाब’बद्दल सांगितले; तिच्या ओळखीतून इतर संशयित मैत्री करायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *