उन्हाळ्यात वीजग्राहकांना अखंडित वीज मिळावी यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामकाजासाठी आज, बुधवारी शहरातील विविध भागांमध्ये सकाळी ८ ते दुपारी १.३० या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तातडीच्या कामासाठी नागपुरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सकाळी काही तासांसाठी बंद राहणार असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भागात वीजपुरवठा राहणार बंद…
काँग्रेसनगर विभागात सकाळी ९ ते १२ या वेळेत नेल्को सोसायटी, सुमितनगर, अध्यापक लेआउट, आझाद हिंदनगर, टाकळी सीम पाण्याची टाकी परिसर आणि एलआयजी-एमआयजी कॉलनीमध्ये वीज नसेल.
सकाळी ८ ते ११ दरम्यान जय बद्रीनाथ सोसायटी, राऊत वाडी, लोकसेवानगर, मनीष लेआउट, गायत्री नगर, परसोडी आणि हनुमान मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. तसेच स्वावलंबीनगर, दीनदयालनगर (सकाळी ८.३० ते १२) आणि जयप्रकाशनगर, सीतानगर, महालक्ष्मी मंदिर परिसर (सकाळी ८ ते १२) या भागातही देखभाल कार्य चालणार आहे. महाजन मार्केट आणि आयुर्वेदिक मार्केटमध्ये सकाळी ८ ते १०, तर इटरनिटी मॉल, व्हीआयपी रोड, काचीपुरा आणि सेंट्रल मॉल परिसरात सकाळी ७ ते १० या वेळेत वीजपुरवठा खंडित असेल असे महावितरणने कळवले आहे.
महाल विभागांतर्गत ओंकारनगर, जयवंतनगर, साईनगर आणि गजानननगर भागात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहील. अयोध्यानगर, उदयनगर चौक आणि साई मंदिर परिसरात सकाळी ७.३० ते १२.३० पर्यंत, तर मेडिकल चौक, रामबाग कॉलनी, जाटतरोडी आणि टी.बी. वार्ड परिसरात सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत तांत्रिक कामे केली जातील. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित राहील. बुटीबोरी विभागातील काचीमेट, शांतीनगर आणि संत जगनाडे नगर भागात सकाळी ७ ते १२ दरम्यान वीज बंद असेल. एमआयडीसी उपकेंद्रातील औद्योगिक ग्राहकांसह रिलायन्स सिमेंट आणि ईशान कास्टींग यांसारख्या मोठ्या उद्योगांचा वीजपुरवठा सकाळी १० वाजतापासून बंद ठेवण्यात येणार आहे.
