पूजाविधीसाठी परदेश दौऱ्याचे स्वप्न दर्शवून पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला लुटणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याने देवदर्शनाच्या दाव्यातून मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकाच्या नावे पतसंस्थेत बनावट खाते उघडून कोट्यवधींचे गैरव्यवहार केले आहेत. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासणीवेळी पतसंस्थेतील काही खातेधारकांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर हे बिंग फुटले आहे. अहिल्यानगरच्या राहाता पोलिसांत खरातसह समता पतसंस्थेच्या तत्कालीन मॅनेजरविरुद्ध गुन्हा नोंद असून, संबंधित पतसंस्थेतील सर्व खातेधारकांची पडताळणी पोलिसांनी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण?
लैंगिक अत्याचार व भोंदूगिरी करणाऱ्या संशयित खरातविरुद्ध नाशिक शहर पोलिसांच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकरा गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ गुन्हे अत्याचाराचे असून, एक खंडणी व दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यासह शिर्डी पोलिसांत खरातविरुद्ध खासगी सावकारी आणि राहाता पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. खरातविरुद्धच्या गुन्ह्यांची संख्या तेरापर्यंत पोहोचली असून, शिर्डी पोलिसांत दाखल सावकारीच्या गुन्ह्यात परब यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यावेळी परब यांच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
देवदर्शनाच्या बहाण्याने ठकबाजी
दरम्यान, दिनेश परब यांनी राहाता पोलिसांत फिर्याद दिली असून, ते मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आहेत. कामानिमित्त चौदा वर्षांपूर्वी त्यांची अशोक खरातसोबत ओळख झाली. खरातने देवदर्शनासाठी बुकिंग करण्याच्या बहाण्याने परब व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो घेतले. त्याद्वारे ही ठकबाजी झाल्याचे समोर येत आहे.