मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताच शिवसेना नेत्याला संपवलं; तीन वर्षांपूर्वीही झाला होता जीवघेणा हल्ला, नांदेडमध्ये खळबळ

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास श्रीनगर परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात कार्यकर्ताचा जागीच मृत्यू झाला. सोनु कल्याणकर (वय 35) अस नाव असून तीन वर्षापूर्वी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. तीन दिवसात हा पाचवा खून असून खुनाच्या घटनेने नांदेड शहर हादरलं आहे.

सोनू कल्याणकर याचे घटनास्थळ पासून काही अंतरावर घर आहे. नियमित पणे तो मॉर्निंगवॉकसाठी जायचा. आज देखील सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला. श्रीनगर मार्गांवरून जातं असताना तीन ते चार जणांनी त्याला घेरले आणि तीक्ष्ण हत्याराने पोटात आणि पाठीत वार करून फरार झाले. रक्तबंभाळ झालेल्या कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेने एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.

तीन वर्षापूर्वी झाला होता गोळीबार

विशेष म्हणजे सोनु कल्याणकर याचा तीन वर्षांपूर्वी जीव घेणा हल्ला झाला होता. रींदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता, त्यात तो बचावला. गोळीबार करणारा गोल मंगनाळे सद्या तुरुंगात आहे. यामागे त्याचा हात आहे का याचा तपास पोलीस करीत आहे. सोनू कल्याणकर हा तरुण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. काही दिवसापूर्वी त्याने भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

तीन दिवसात पाच जणांचा खून

नांदेडमध्ये सद्या खुनाची मालिका सुरु आहे. मागील तीन दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. दोन दिवसापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिहेरी हत्याकांड घडलं. वर्चस्वाच्या वादातुन सदा गँग आणि साई लाला गँगच्या सदस्यामध्ये राडा जाला होता. यात अर्जितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज याचा खून झाला, त्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्ली येथे रज्जुसिंघ तबेलेवाले याचा खून करण्यात आला.

आज सकाळीं सोनू कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला. तीन दिवसात पाच खूनाची घटना घडल्याने कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *