प्रवासात ओळख वाढवली; कल्याणमध्ये तिघा रिक्षा चालकांचा महिलेवर सामूहिक अत्याचार, पार्टीला बोलवून कुकर्म

कल्याण पूर्वेकडे राहणाऱ्या सुरक्षारक्षक महिलेशी ओळख वाढवत कल्याणमधील एका रिक्षा चालकाने आपल्या आणखी दोन रिक्षा चालक मित्राच्या मदतीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. हेमंत चव्हाण, चेतन चव्हाण आणि उमेश वर्मा अशी आरोपींची नावे आहेत.

काय झालं नेमकं?

कल्याणजवळील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी महिला कल्याण पूर्वेकडे मैत्रिणीच्या घरी राहते. दररोज कल्याण ते भिवंडी असा रिक्षाप्रवास करणाऱ्या या महिलेशी हेमंत चव्हाण याने ओळख वाढवली. २६ मार्च रोजी ही महिला आपल्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी रात्री कल्याण बायपासजवळ थांबलेली असताना हेमंत याने फोन करून तिला कल्याणमध्ये येण्याबाबत विचारले.

ओळख असल्याने ही महिला त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली, मात्र हेमंतने पार्टीबाबत विचारणा करत आपला मित्र चेतन याला बरोबर घेतले. पुढे डोंबिवली खंबाळपाडा परिसरात उमेश वर्मा हाही त्यांच्यासोबत आला. या महिलेला पार्टीच्या नावाखाली मद्य पाजण्यात आले. यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *