गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना नाशिकमधून एक अजून स्कँडल उघडकीस आलंय. सातपूरमधील एका व्यावसायिकाचा टॅब ऑफिसमधून चोरी गेला आणि त्यानंतर 200 अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. नाशिकच्या एका बड्या व्यावसायिकाचे त्याच्या मैत्रिणीसोबतचे हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी चोरी करणाऱ्यांनी दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
नाशिक बिझनेसमनचा टॅब चोरीला अन् मग…
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधील एका बड्या बिझनेसमनच्या ऑफिसमधून टॅब चोरीला गेला. चोरी करणाऱ्यांनी या टॅबमधील सर्व डेटा मिळवला. ज्यात त्यांना त्या व्यावसायिकाचे मैत्रिणीसोबत असलेले अश्लील व्हिडीओ सापडले. याच अश्लील व्हिडीओला व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी बिझनेसमनला खंडणी मागितली. चोरांनी बिझनेसमनकडे 12 लाखांची खंडणी मागितली. यानंतर बिझनेसमनने सातपूर पोलीस ठाण्यात टॅब चोरीची तक्रार दाखल केली.
बिझनेसमन तक्रारीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, 2 एप्रिल 2026 दुपारी 12 वाजता मोबाईलवर एक फोन आला. त्यावर त्यांनी धमकी दिली की, मला 7 वाजेपर्यंत 50 हजार रुपये द्या आणि तुमच्या टॅब घेऊन जा. या फोननंतर बिझनेसमनने ऑफिस गाठत टॅब चोरीला गेला की नाही याची खात्री करुन घेतली. त्यानंतर बिझनेसमनच्या लक्षात आलं की, टॅब चोरीला गेला आहे. त्यानंतर चोरांनी परत फोन करत 12 लाखांची खंडणी मागितली. कारण चोरट्यांना त्या टॅबमध्ये बिझनेसमनचे जुन्या मैत्रिणीसोबत असलेले काही खासगी फोटो आणि व्हिडीओ सापडले होते. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी खंडणीची रक्कम वाढवली.
दरम्यान बिझनेसमन या चोरांना खंडणी रक्कममधील 10 हजार देण्यासाठी गेलं असताना पोलिसांनी 4 जणांना पकडलं आहे. सातपूर पोलिसांनी संशयित आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे यांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीतच टॅबमध्ये दीडशे ते दोनशे व्हिडीओ असल्याचे समोर आले आहेत. या प्रकरणात तक्रारदारा बिझनेसमनवरही संशय व्यक्त करण्यात येत असून, मोठे सेक्स स्कँडल उघड होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केलीय.
