बायको माहेरी गेलीये, तू ये’, नौदल अधिकाऱ्याने घरी बोलावून केली प्रेयसीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले अन् नंतर तेच तुकडे…

विवाहित प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची अत्यंत निर्देयीपणे हत्या केली आहे. आरोपी चिंताडा रवींद्र नौदलाचा अधिकरी असून त्याने प्रेयसी पोलिपल्ली मौनिकाला बायको माहेरी गेल्याचं कारण सांगत घरी बोलावलं. तू घरी ये आपण काही वेळ एकत्र घालवू असं त्याने सांगितलं होतं. पण प्रेयसीला आपण मृत्यूचं आमंत्रण स्विकारत आहोत याची कल्पनाच नव्हती. घरी गेल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. आणि याच रागात त्याने तिची हत्या केली. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडेही केले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ही घटना घडली आहे.

भारतीय नौदल जहाज ‘डेगा’ (INS Dega) वर कार्यरत असलेला नौदल अधिकारी रवींद्र याची 2021 मध्ये एका डेटिंग ॲपवर मोनिकासोबत भेट झाली होती. 35 वर्षीय रवींद्र आणि 29 वर्षीय पोलिपल्ली मौनिका यांच्यात नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघे विशाखापट्टणम येथील पार्क, थिएटर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांना भेटायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही आठवड्यांपूर्वी रवींद्रची पत्नी आपल्या माहेरी विझियानगरम येथे गेली होती. प्रेयसीसोबत वेळ घालण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे असा विचार करत रवींद्रने रविवारी संध्याकाळी मौनिकाला घरी बोलावलं. पण संध्याकाळपर्यंत दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. याच भांडणार रवींद्रने मौनिकाची चाकूने भोसकून हत्या केली.

रवींद्र फक्त हत्येपर्यंत थांबला नाही. त्याने मृतदेहाचे तुकडे केले. यातील काही भाग त्याने एका पिशवीत भरले आणि ते नष्ट करण्याच्या हेतूने निर्जनस्थळी घेऊन गेला. यावेळी त्याने काही भाग घरातील फ्रीजमध्येच ठेवले होते.

त्यानंतर रवींद्र चालतच एका पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांने पोलिसांसमोर दावा केला की, मोनिकाने त्याच्याकडून 3.5  लाख रुपये घेतले होते आणि ती वारंवार त्यांचे संबंध त्याच्या पत्नीला उघड करण्याची धमकी देत ​​होती. याच कारणामुळे त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. मोनिकाची हत्या झाली त्या दिवशी असाच वाद झाला होता असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना घरात आणि रेफ्रिजरेटरमध्ये शरीराचे तुकडे आढळले. मोनिकाचे शिर मात्र तिथे नव्हते. रवींद्रने त्याची दुसऱ्या ठिकाणी विल्हेवाट लावली असावी असा पोलिसांना संशय आहे.

बेपत्ता झालेले शरीराचे अवयव शोधण्यासाठी आता पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाने 18 मे 2022 रोजी झालेल्या श्रद्धा वालकर हिच्या क्रूर हत्येची आठवण करुन दिली आहे. दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरात, श्रद्धाचा ‘लिव्ह-इन पार्टनर’ असलेल्या आफताब अमीन पूनावाला याने गळा दाबून तिची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कापलेले अवयव एका रेफ्रिजरेटरमध्ये भरून ठेवले. त्यानंतर पुढील काही दिवस राजधानीतील विविध ठिकाणी त्याने ते तुकडे फेकून दिले होते. सध्या तो अटकेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *