पुण्यात ‘पीएमपी बस’च्या ॲपमुळे तिकीट बुकिंग सोपं, 1 एप्रिलपासून प्रशासनाचा उपक्रम; काय आहेत वैशिष्ट्ये?

पुण्यात पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने आपलं अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या आधारे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतात. परंतु, अनेक प्रवशांना याबद्दल माहिती नसल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून 1 एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे. यामध्ये अधिकाधिक प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

कसा होईल फायदा?

पीएमपीच्या प्रमुख बस स्टॉपवर बसच्या आतमध्ये, सीट शेजारी, आणि बाहेर पॅनेवलवर क्यूआर कोड लावले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना हे अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या अॅपचा वापर करून बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यापासून बसचे रिअल टाइम लोकेशन आणि संपूर्ण वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना सहजपणे मिळते. सध्या 2.5 दशलक्षाहून अधिक प्रवासी या अॅपचा वापर करतात. परंतु, ही संख्या प्रवाशांपेक्षा कमी असल्यामुळे अॅपवापर करणाऱ्यांची संख्याही वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *