96 वर्षांच्या ‘दख्खनच्या राणी’ला नवा साज, डायनिंग डब्याचं नूतनीकरण; मुंबई-पुणेदरम्यान आरामदायी प्रवास

मुंबई-पुणे या उण्यापुऱ्या साडेतीन-चार तासांच्या प्रवासासाठी अनेक गाड्या उपलब्ध असल्या तरी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचे आकर्षण प्रवाशांमध्ये कायम आहे. ९६ वर्षांच्या या ‘क्वीन’ला आता नवा साज मिळाला असून नवाकोरा डायनिंग डबा (कार) या गाडीला जोडण्यात आला आहे. त्यात वारली चित्रकलेला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना वारली पेंटिंग्जच्या साथीने चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

शुक्रवारपासून सेवा सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आयोजित केलेल्या ट्रेन महोत्सव कार्यक्रमात नव्या धाटणीतील प्रवासी डब्यासह डेक्कन क्वीन मुंबईहून पुण्याकडे शुक्रवारी रवाना झाली. डायनिंग डबा असलेली एकमेव गाडी असे याचे वैशिष्ट्य आहे. डायनिंग कारमध्ये सुविधा उन्नत करण्यासाठी त्याचे नूतनीकरण गेल्या महिन्याभरापासून सुरू होते. यामुळे एक्स्प्रेसमधील डायनिंग कारऐवजी पॅन्ट्री कार जोडण्यात आला होता. प्रवासी सुविधा उन्नत करण्याचे मध्य रेल्वेने हाती घेतलेले काम नुकतेच पूर्ण केले आहे.

वातानुकूलित आणि विनावातानुकूलित डब्यांतील सर्व स्वच्छतागृहांना आकर्षक विनाइल लावून नव्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. वातानुकूलित डब्यातील आसनांना सीट कव्हर्स बसवण्यात आले. छत आणि पॅनल बोर्ड बदलून नव्या संकल्पनेवर डिझाइन देण्यात आल्यामुळे डब्यांतील सजावट प्रवाशांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. एसी डब्यांमध्ये एअर फ्रॅग्रन्स डिस्पेंसर, स्वच्छतेसाठी टिश्यू पेपर डिस्पेंसर, साबण वितरक आणि ड्युरो वाइप मॅट्सची सुविधा सर्व स्वच्छतागृहांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डायनिंग डब्यात काय ?

  • खुच्र्यांऐवजी सोफा पद्धतीने आसन व्यवस्था करण्यात आली आहे
  • डब्यातील दिव्यांची रचना बदलून अलिशान स्वरूपात करण्यात आली आहे
  • डब्यांच्या आतमध्ये सर्व ठिकाणी वारली चित्रांचे विनाइल रॅपिंग करण्यात आले आहे
  • त्याचबरोबर सन १९३० मधील एक्स्प्रेसचे काही मनोवेधक फोटो लावून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे

 

‘बेस्ट उपक्रमाला बळकटी देऊ’

‘बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिका कटिबद्ध आहे. सेवानिवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांचे उपदान आणि इतर कायदेशीर देणी प्रदान करण्‍याबाबत आम्ही संवेदनशील आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *