अस्सल मराठी भागात गुजरातीत फलक, परळ पूल बंद असल्याची सूचना…; नेमकं काय घडलं?

मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. मुंबईतील सगळ्या वर्दी असलेल्या अस्सल मराठी भाषित परिसरात पुन्हा एकदा मराठी भाषेमुळे वाद पाहिला मिळाला आहे. परळ ब्रिजवरील एक लाइन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अशातच या परिसरात या ब्रिज बंद असलेला फलक हा दोन भाषांमध्ये लिहिण्यात आला आहे. या फलकावर इंग्रजी आणि गुजरातीमध्ये सूचना लिहिण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

परळ पूल बंद असल्याची सूचना…; नेमकं काय घडलं?

परळ पूल बंद असल्याची सूचना गुजरातमध्ये लिहिलं असल्याची माहिती ठाकरे सेनेच्या शाखा प्रमुखांना मिळाल्यानंतर ते आक्रमक झाले. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख मिनार नाटाळकर  यांनी घटनास्थळी जाऊन ठेकेदाराला या फलकाबद्दल जाब विचारला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईत  मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

दरम्यान, ठाकरेंच्या सेनेचे शाखाप्रमुख मिनार नाटाळकर यांनी या संदर्भात आपल्या सोशल मीडिया पोस्टही शेअर केली आहे. त्यात नाटाळकर यांनी मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *