चोरीचा संशय अन् सख्या बापाने दोन्ही पोरींना अख्खी रात्र उलटं टांगलं, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरु

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात बापच दोन बहिणीच्या जीवावर उठला. हृदय पिळवटून टाकणारी घटनामुळे सांगली हादरली आहे. बापाला दोन्ही पोरींवर चोरीचा संशय होता म्हणून बापाने त्यांचा अमानुष छळ केला. ज्यात एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर दुसरीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्षीय सानिका हिचा मृत्यू झाला, तर  13 वर्षीय अनुजा गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहे. तर निदर्यी बापाचे नाव नाना हैबत यमगर असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजारच्या घरात चोरी झाली याचा संशयावरून बापाने दोन्ही मुलींचे हात पाय बांधून त्यांना अख्खी रात्र घरातील पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. रागाच्या भरात बापाच्या या क्रूरतेमुळे एका मुलीचा मृत्यू झाला आहे. रात्रभर त्या चिमुकल्या वेदनेने तडफडत ‘पाणी, पाणी’ अशी आर्त हाक देत होत्या. पण आई – वडिलांच्या कानावर ते शब्दही जणू ऐकूच येतं नव्हते.

सांगली हादरली

आटपाडी तालुक्याच्या बनपुरीमधील या संतापजनक प्रकारामुळे एकच संतापजनक वातावरण आहे. या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यमगर यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला. त्यानंतर संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या दहा वर्षाच्या सारिका आणि तेरा वर्षीय अनुजाला अमानुष्य शिक्षा दिली.  ज्यामध्ये सारिका यमगारीचा तडफडून मृत्यू झाला आहे, तर अनुजा किती प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. याघटनेनंतरआटपाडी तालुका सुन्न झाला आहे.

अशी उघड झाली घटना

ज्यावेळी अनुजा शुद्धावर आली तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. अनुजाने डॉक्टरांना झालेल्या सर्व प्रकाराबद्दल सांगितलं. वडिलांनी त्यांना कसं उलटं टांगून मारहाण केली असं तिने डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *