सर्वसामान्यांना वीज कंपन्यांचा मोठा दिलासा; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपातीचा निर्णय, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपातीचा निर्णय वीज कंपन्यांनी घेतल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहे. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे. नवीन दरपत्रकानुसार सर्वच युनिट स्लॅबमध्ये कपात करण्यात आलीये.

प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

2025 – 26 या आर्थिक वर्षात 0 ते 100 युनीटसाठी पूर्वी 4.76 रुपये द्यावे लागायचे. आता  2026 – 27 आर्थिक वर्षात 0 ते 100 युनीटसाठी 1 एप्रिलपासून 4.3 रुपये द्यावे लागणार आहे. याचा अर्थ वीज दरात 9.7 टक्के कपात करण्यात आली आहे.

2025 – 26 या आर्थिक वर्षात 101 ते 300 युनीटसाठी पूर्वी 7.96 रुपये द्यावे लागायचे. आता  2026 – 27 आर्थिक वर्षात 101 ते 300 युनीटसाठी 1 एप्रिलपासून 7.1 रुपये द्यावे लागणार आहे. याचा अर्थ वीज दरात 10.8 टक्के कपात करण्यात आली आहे.

2025 – 26 या आर्थिक वर्षात 301 ते 500 युनीटसाठी पूर्वी 13.55 रुपये द्यावे लागायचे. आता  2026 – 27 आर्थिक वर्षात 301 ते 500 युनीटसाठी 1 एप्रिलपासून 11.64 रुपये द्यावे लागणार आहे. याचा अर्थ वीज दरात 14 टक्के कपात करण्यात आली आहे.

तर, 2025 – 26  या आर्थिक वर्षात 500 पेक्षा युनीटसाठी 14.55 रुपये द्यावे लागणार आहेत. 2026 – 27  या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी 12.64  रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात 13.1 टक्के कपात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *