मागील भांडणाची कुरापत काढून शेख सलीम शेख चांद उर्फ मोहम्मद मोट्या (वय ३२) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सलीम शेखचा भाऊ शेख हनिफ चांद उर्फ राजू यांनी पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जुन्या भांडणाची कुरापत
शहरातील अख्तराबाद भागात मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री हा खुनाचा प्रकार घडला. सात ते आठ संशयितांनी हातात लाठ्या, काठ्या, कोयते, तलवार घेऊन फिर्यादी हनिफ यांचा भाऊ व त्याचा एक मित्र बिडी गोडावून अख्तराबाद येथे उभे असताना त्यांच्याजवळ जाऊन मागील भांडणाच्या कुरापतीतून धारदार तलवारीने सलीमच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच अन्य जणांनी हातातील कोयत्याने सलीमच्या डोक्यावर व हातापायावर मारहाण केली. या गंभीर मारहाणीत सलीमचा मृत्यू झाला. साक्षीदार फैयाज अहमद मोहमद आमीन (रा. बडा कब्रस्तान, ५२ खोली) याला संशयित आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर, उजव्या पायावर, डाव्या हातावर कोयत्याने, तलवारीने व लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी संशयित मतीन मुल्ला, कलिम मतीन मुल्ला उर्फ कलिम नाट्या, शोएब अली, बिलाल, रियाज मोहम्मद, रिजवान, सैफ अली, (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. अख्तराबाद, मालेगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कॅम्प विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक दर्शन दुग्गड, पोलिस निरीक्षक आर. एस. खताळ यांनी भेट देऊन पाहणी केली.
नाशिकमधील बालिकेला अत्याचार करुन संपवलं
लहान मुलीवरील अत्याचार व हत्येच्या अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या संवेदनशील खटल्यातील मुख्य आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने त्याची बाजू कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे मांडण्याची संधीच दिली नसल्याचा विपरित परिणाम झाल्याचे मंगळवारी समोर आले. नाशिकमधील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी विलास महाले याला सुनावलेली फाशीची शिक्षाच रद्द करुन संपूर्ण खटला नव्याने चालवण्याचा आदेश देण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयावर आली. परिणामी, पीडित कुटुंबातील व्यक्तींना आता पुन्हा खटल्यातील साक्ष व उलट तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
