LPG सिलेंडरबाबतचा नवा नियम, पहिल्या आणि दुसऱ्या सिलेंडरच्या बुकींमध्ये नेमकं काय बदललं?

आखाती देशांमध्ये असणारा तणाव, इराण- इस्रायल युद्ध आणि होर्मुद सामुद्रधुनी बंद असण्याचा एकंदर परिणामच भारतातील एलपीजी आणि इंधन पुरवठ्यावर आला. ज्यामुळं ठिकठिकाणी सामान्य नागरिकही गॅस वितरण केंद्रांबाहेर नागरिकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली. अनेक उद्योगांवर या तुटवड्याचा परिणाम झाला. ही परिस्थिती आणि नागरिकांमध्ये असणारं चिंतेचं वातावरण पाहता एलपीजी बुकिंगसंदर्भात नियमांत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे.

नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे डबल सिलेंडर एलपीजी कनेक्शन असेल, तर तुम्ही पहिला सिलेंडर बुक केल्याच्या 25, 45 दिवसांनंतरच दुसरा सिलेंडर बुक करू शकणार आहात. घरगुती गॅस सिलेंडर वितरणात होणारा काळा बाजार थांबवत पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. जिथं दोन सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आलं आहे.

सिलेंडर बुक करताना काय लक्षात घ्यावं?

केंद्राच्या नव्या नियमानुसार 14.2 किलो वजनाच्या घरगुती वापरातील एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी आणि त्यानंतर दुसऱ्या सिलेंडर बुकिंगदरम्यानचा (रिफील) काळ आता 25 दिवसांवरून थेट 35 दिवस करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. मात्र चिंता करण्याचं कारण नाही असंच केद्रानं सांगितलं.

LPG रिफिल बुकिंग टाइमलाइन संदर्भात केंद्रानं काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. असून शहरी भागांमध्ये 25 दिवसांनंतर LPG रिफिल बुकिंग, ग्रामीण क्षेत्रांमध्ये 45 दिवसांनंतर LPG रिफिल बुकिंगचे नियम सर्व प्रकारच्या कनेक्शनवर लागू असतील. दरम्यानच्या काळात कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या वृत्तांना बळी पडू नये असं आवाहन केंद्रीय यंत्रणेनं केलं असून, कोणत्याही तणावाशिवाय सिलेंडर बुक करत साठेबाजी न करण्याचा सल्ला दिला आहे. देशात एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचंही केंद्र शासनानं सांगितलं आहे.

सिलेंडर बुकिंगसंदर्भात ग्राहकांना अडचणी आल्यास, सविस्तर माहिती हवी असल्यास हेल्पलाईन क्रमांकसुद्धा जारी करण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक आहे 1800-2333-555.

कोणत्या ग्राहकांवर होणार परिणाम?

सिलेंडर बुकिंगसंदर्भातील निर्णयांचा सर्वाधिक परिणाम शहरी नागरिकांवर होणार असून, ज्यांच्याकडे डबल सिलेंडरची सुविधा आहे त्यांना आला पुढील बुकींगसाठी घाई न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत सरकारनं ही नवी कालमर्यादा ठरवली असून, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना पुढच्या अर्थात दुसऱ्या सिलेंडर बुकिंगसाठी 45 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मात्र ज्या ग्राकांकडे एकच सिलेंडर बॉटल कनेक्शन आहे SBC आहे ते 25 दिवसांनी नव्या बुकिंगसाठी पात्र असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *