राजकीय नेत्यांचा गुरु शाळेतला ‘ढ’ विद्यार्थी! खरातचा SSC Result पाहिला का? गणिताचे मार्क पाहून उडाल

एक लाख रुपया एक चिंचोका विकणारा, एक किलो मध 9 लाखांना विकणारा नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात कितवी शिकला असेल? असा प्रश्न विचारला तर तुम्हाला नक्कीच अनेक अधिकारी आणि बड्या मंत्र्यांना गंडवणारा हा भोंदू बराच उच्चशिक्षित असेल असं वाटेल. त्याचे कारनामे आणि त्याने ज्या पद्धतीने लोकांना गंडा घातला आहे ते पाहता खरातचं शिक्षण बरंच असेल असं वाटणं चुकीचं नाही. पण आता खरातची शैक्षणिक पार्श्वभूमी समोर आली असून तो कितवी शिकलाय हे पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्या शाळेत शिकलाय खरात?

सिन्नर तालुक्यातील खांडळवाडी मध्ये राहणार खरात हा वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. अंकशास्त्र शिकवणारा व्यक्ती स्वतःच गणितात नापास झाला होता. खरातचं शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालेलं आहे. त्याचा दहावीच्या निकालाची प्रत समोर आली आहे.

स्वत: गणितात नापास

अनेकांना लाखोंचा गंडा घालून लुबाडणाऱ्या या भोंदूला दहावीमध्ये गणित विषयात पास होता आलं नव्हतं. खरातच्या दहावीच्या निकालामध्ये त्याला गणितात 100 पैकी केवळ 28 मार्क होते. खरातला एकूण 251 मार्ग मिळाले होते. म्हणजेच टक्क्यांमध्ये सांगायचं झालं तर त्याला फक्त 35.88 टक्के मार्क मिळाले होते.

कोणत्या विषयात किती मार्क?

विषयनिहाय निकलाबद्दल बोलायचं झालं तर खरातला मराठीमध्ये 39 गुण होते. इंग्रजीमध्येही खरात काठावरच पास झाला होता. त्याला इंग्रजीमध्ये 100 पैकी 37 गुण मिळाले होते. विज्ञानामध्ये खरातला सर्वाधिक म्हणजेच 62 मार्क होते. समाजशास्र विषयामध्ये 38 तर हिंदीमध्ये 47 गुण होते. धक्कादायक बाब म्हणजे नाव बदलून ‘अशोककुमार’ तर कॅप्टन उपाधी लावून जहाजावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विश्वस्तांनाही घातला गंडा

भोंदू अशोक खरातने ईशान्येश्वर मंदिराच्या विश्वस्तांनाही फसवले होते. ईशान्येश्वर मंदिराचे ट्रस्ट स्थापन करताना सामाजिक कार्याची आश्वासने खरातने दिली होती. संस्थेच्या माध्यमातून शाळा, गोशाळा यांसह विविध सामाजिक संस्था उभारण्याची आश्वासने देण्यात आली होती. शिवनिका संस्थानच्या माध्यमातून समाजउपयोगी कामे करणार असं विश्वस्तांना सांगितलं होतं. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काम होतं नसल्याने अनेक विश्वस्त खरातपासून दूर गेल्याची माहिती आता समोर येत आहे.

शिवनीका संस्थांनच्या विश्वस्त मंडळातून बाहेर पडणाऱ्या माजी विश्वास्तांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.  आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी देखील सांगितलं शिवनिका संस्थानच्या माध्यमातून सीबीएससी शाळा आणि गोशाळा बांधण्याच्या नावाखाली पैसे लुबाडण्याचा आरोपी खरातचा प्लॅन होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *