5 नरबळी, कस्तुरीसाठी हरीनाची शिकार अन् सिद्ध पूजेसाठी वाघ सापाची कातडी…; भोंदूबाबा खरातच्या कोठडीसाठी कोर्टात काय झाला युक्तीवाद?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजतोय. पोलिसांनी ट्रॅप रचून अशोक खरातला लैंगिक अत्याचार प्रकरणात त्याच्याच फार्महाऊमधून उचलण्यात आलं. अशोक खरातबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. मंगळवारी अशोक खरातला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. कोर्टाने सरकारी वकीलाच्या युक्तीवादानंतर अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

5 नरबळी, कस्तुरीसाठी हरीनाची शिकार अन् सिद्ध पूजेसाठी वाघ सापाची कातडी…

सरकारी वकिलांनी कोर्टात अशा युक्तीवाद केला की, अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय आहे. या संशयानंतर एकच खळबळ माजली आहे. सरकारी वकिलाने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. अशोक खरातच्या घराची झाडाझडती घेण्यात आली तेव्हा वापरलेल्या 5 बंदुकीच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे अशोक खरातने 5 नरबळी दिल्याची शक्यता कोर्टात वकिलाने उपस्थितीत केली आहे.

त्यासोबत अशोक खरात कसा प्रकारची पूजा करायचा, विधी कसे आणि कोणते असायचे याबद्दल पोलिसांना तपास करायचा आहे. अशोक खरातच्या गुन्हाची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलाने कोर्टात केली.

पुढे सरकारी वकिलाने युक्तीवादात सांगितलं की, अशोक खरातच्या घरातून लॅपटॉप, मॅकबुक आणि 6 लाख सापडले आहेत. त्याच्याकडे बंदूक आणि गोळ्या अधिकृत लायसन्स आहेत, मात्र पेन ड्राईव्ह बद्दल काही बोलले जात नाहीये. जे काही द्रव्य पाजले गेले त्याची तपासणी करण्यासाठी पहिली पोलीस कोठडी देण्यात आली. मात्र पुन्हा त्याच पद्धतीने पुनः तपासासाठी करायची आहे. मालमता रेकॉर्ड , शिवानिका संस्थान रजेस्ट्रेशन धर्मदाय आयुक्तांकडे मिळू शकतात असाही दावा कोर्टात करण्यात आला आहे.

तर शिवानिका संस्थानची मालमत्ता आणि तेथील अघोरी कृत्य होतात का याचाही पोलिसांना तपास करायचा आहे. यामध्ये खूप मोठी व्यक्तीचा हात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. तर  साप – वाघाची कातडी खरी आहे की खोटी ते तपासायचे आहे. शिवाय कस्तुरीसाठी हरिणाची शिकार करण्यात आली का याचाही शोधही करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *