दारु पिऊन बायकोला मारहाण केल्यास हजार रुपये दंड! गडचिरोली जिल्ह्यातील ब्राह्मणपल्ली ग्रामसभेचा ठराव

छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील ब्राह्मणपल्ली हे अवघे १,७०० लोकवस्तीचे गाव दारूविरोधात एकजुटीने उभे राहिले आहे. गावात दारूविक्री केल्यास २० हजार रुपये तर, दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दंडातून जमा होणाऱ्या रकमेचा गावाच्या विकासासाठी वापर केला जाणार आहे.

ब्राह्मणपल्ली हे गडचिरोली शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. गावाजवळून छत्तीसगडची सीमा अगदीच जवळ आहे. गावात दारूमुळे दररोज हाणामाऱ्या, कौटुंबिक हिंसाचार वाढला होता. गाठीशी असलेला पैसा दारूसाठी उडविला जात असल्याने मुलांचे शिक्षण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘मुक्तिपथ’च्या माध्यमातून कार्य करण्यात आले. यातूनच रविवारी झालेल्या ग्रामसभेत ब्राह्मणपल्लीला दारूमुक्त घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या नियमांची अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी गावपातळीवर एक समिती स्थापन करण्यात आली. दारूविरोधी नियमांचा एक संच तयार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *